पाली दि.९: आताच्या डिजिटल युगात प्रत्येकजण घराबाहेर पडून नोकरी धंदा करतोय पण शेती करताना आमचा तरुण दिसत नाही. आता दिसताहेत ते त्या तरुणाचे आई वडील. पण आई वडिलांनंतर शेतीचे काय होणार. खरेतर शेती टिकली तरच आपण टिकणार आहोत.
आणि अशा ह्या धाकधूकीच्या जीवनात जे शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करून शेती करताहेत. अशा शेतकऱ्यांचा शेतीत नाविण्यापुर्ण बदल करून अधिक उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार रायगड प्रेस क्लब. च्या माध्यमातून करण्यात येतोय. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन आदर्श आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार आमचे पत्रकार बांधव करताहेत. आणि असा सत्कार प्रत्येक ठिकाणी व्हयला हवे. आज शेतकऱ्यांना प्रोत्साहणाची गरज आहे. शेतकरी जी शेती करतोय त्याबद्दल त्याना पाठिंबा देणे गरजेचे आहे. असे व्यक्त्यव्य अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी पाली मराठा समाज हॉल येथे झालेल्या शेतकरी सत्कारप्रसंगी काढले. रायगड प्रेस क्लब व सुधागड प्रेस क्लब यांचेतर्फे जिल्ह्यातील एक कार्यक्रम पाली येथे मराठा समाज हॉल येथे घेण्यात आला.
याप्रसंगी आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण सचिव मनोज खांबे, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, कार्याध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष मोहन जाधव, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष विजय मोकल, खजिनदार दरवेश पालकर, सीमा मोरे पार्टे, राजकीय नेते प्रकाश देसाई, राजेश मपारा, सुधागड तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, रिपाई तालुकाध्यक्ष राहुल सोनवले, मेघा पाईपचे विजय संकपाल, अनुपम कुलकर्णी, सचिन जवके, दीपक पवार, सुधागड प्रेस क्लब अध्यक्ष विनोद भोईर, कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ, पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे इतर तालुक्यातील प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सुधागड तालुक्यातील पुरस्कर्ते शेतकरी
सुधीर केदारी, संगीता सोनावले, संतोष जोरकर, परशुराम शेवाळे या शेतकऱ्यांचा शाल सन्मानचिन्ह, वृक्षरोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!