कळंबोली दि.१० : कळंबोली वसाहतीमध्ये जणू काही हातगाड्यांचे पेवच फुटल्यासारखे दिसत आहे. सर्वत्र रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवरती अनेकांनी आपले बस्तान मांडले आहे. अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांनी कळंबोलीचे प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण यांच्याकडे फोटो व्हिडिओ सहित तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून पाच हात गाड्या जप्त करून त्या तोडून नामशेष केल्या. त्याचा धसका अन्य हातगाडी चालकांनी घेतल्यानंतर रस्त्यावर हातगाड्या गायब झाल्या. महापालिकेच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये विविध ठिकाणी महापालिकेने हॉकर्स झोन निर्माण केले आहेत. हॅकर्स झोन असतानाही कळंबोलीच्या रस्त्यावर दुतर्फा हातगाड्यांवर फेरीवाल्यांनी आपल्या बस्थान मांडले आहे. हे हातगाडी चालक बहुतांशी परप्रांतीय आहेत. दररोज हातगडांवर व्यवसाय करून पुन्हा मानखुर्द गोवंडी मुंब्रा या भागात ते जातात. इथे त्यांचे सर्व लागेबांधे असतात. त्यांच्या गाडीसमोर कळंबोलीतल्या नागरिकांनी दुचाकी उभी केली तरी ते अंगावरून येतात. वटपौर्णिमेच्या दिवशी जुन्या सुधागड रस्त्यावर प्रचंड गर्दी असतानाही पाच ते सहा हातगाड्या रस्त्यावर लावून त्यांनी आपले मस्तान मांडले होते. त्यांना सांगून ऐकत नव्हते. अखेरीस रस्त्यावर असलेल्या हातगाड्यांचे फोटो व्हिडिओ काढून कळंबोलीचे प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण यांना पाठवले. अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन त्या भागात गस्त घालणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगून पाच हातगाड्यात जप्त केल्या व त्या हातगाड्या जेसीबीच्या साह्याने तोडून नामशेषही करण्यात आल्या. महापालिकेने केलेल्या या कारवाईचे कळंबोलीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच कळंबोली पूर्ण हातगाडी मुक्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
![]()
