पनवेल दि.९: शिक्षणक्षेत्रात विविध उपक्र‌माद्वारे विदयार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विदयार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातीय, विविध जिल्हयातील पंधरा महिला शिक्षिकांना वुमन टीचर्स फोरम स्टेट इनोव्हेशन अँड रिचर्स फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025” हा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळोजे पाचनंद येथील योगिनी यल्लाप्पा वैदू यांना प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील शिवछ‌त्रपती रंगभवन सभागृह येथे ४ मे २०२५ रोजी हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रिसिजन फांउडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
यावेळी जिल्हा परीक्षा परिषद, पूणे उपायुक्त संजयकुमार राठोड सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, , सामाजिक कार्यकर्त्या सुजाता लोहकरे, प्रशासकीय अधिकारी (मुंबई) शशिकांत शिंदे, सर फाउंडेशनच्या राज्य समन्वयक हेमा वाघ, बाळासाहेब वाघ, सिद्धराम माशाळे, शिवाजी वडते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
योगिनी वैदू यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
योगिनी वैदू यांना २०१७ पासून शाळा बाहय मुलांसाठी उभी असलेल्या चळवळीतील भरीव योगदान तसेच कमी पटा ची शाळा बंद पडू न देता ती जीवंत करणे तसेच लायन्स क्लब मध्ये स्वतः अध्यक्षतेची धुरा सांभाळत शाळांना शैक्षणिक मदत पुरविले. गुणवत्ता देण्याकरिता सवैव तत्पर अश्या गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक कामगिरी करिता त्यांना अनेक स्तरावरून सन्मानित करण्यात आलेले आहे.

🛑कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी ♦️रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ देणाऱ्या देणगीदारांचा केला गेला सन्मान

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!