पनवेल दि.२९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी २०२१ मध्ये सातवी ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी हि स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून होणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ व १७ जानेवारी २०२१ रोजी पिंपरी चिंचवड, पुणे येथे तर दिनांक २२ ते २४ जानेवारी २०२१ पर्यंत चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय खांदा कॉलनी येथे होणार असून अंतिम फेरी २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल खेर (९८२०२३३३४९) किंवा गणेश जगताप (९८७०११६९६४), यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-अशी आहेत पारितोषिके –
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेञी/लेखक/संगीत/नेपथ्य/प्रकाश योजना/ उतेजनार्थ असे विविध पारितोषिके असणार आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!