फोटो सर्कल सोसायटी'च्या छायाचित्र प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दि.१४: छायाचित्रण हे कला आणि विज्ञान यांचे मिश्रण आहे आणि प्रभावशाली प्रतिमा तयार करण्यासाठी त्याचे मूलभूत घटक समजून घेणे आवश्यक आहे. हेच दर्शविण्याकरिता फोटो सर्कल सोसायटी’ गेली २५ वर्ष कार्य करीत आहे.
फोटोग्राफीमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे व्यावसायिक तयार व्हावेत हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून २५ वर्षांपूर्वी पेरण्यात आलेले बीज म्हणजे फोटो सर्कल सोसायटी’. याच वृक्षाच्या छायेत कित्येक तरुण-तरुणींनी अनेक स्वप्नं पाहिली आणि ती साध्यही केली. फोटो सर्कल सोसायटीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त 10 ते 17 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन -आविष्कार – 2024′ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि या निमित्त आयोजित कार्यशाळांना ठाणेकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननिय बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सोसायटीजवळ, ज्ञानसाधना कॉलेज रोड, तीन हात नाका, ठाणे पश्चिम येथे हे छायाचित्र हे प्रदर्शन भरले आहे.
10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार, अभिनेते सुयश टिळक यांच्या हस्ते संपन्न झाले.
11 नोव्हेंबर रोजी मंदार सोमवंशी यांची मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा,
12 नोव्हेंबर रोजी विकास शिंदे यांची टेबलटॉप व फूड छायाचित्रण कार्यशाळा,
13 नोव्हेंबर रोजी फॅशन फोटोग्राफी या विषयावर मयूर नारंगीकर यांची कार्यशाळा,
14 नोव्हेंबर रोजी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक सागर गोसावी यांचे ‘ हिमालियन वन्यजीवन ‘ या विषयावर फिल्म स्क्रिनींग.
15 नोव्हेंबर रोजी स्वप्नाली मठकर यांनी मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा.
16 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ छायाचित्रकार मेळावा, सदर मेळाव्यात जेष्ठ छायाचित्रकार व वन्यजीव अभ्यासक केदार भिडे यांचे ‘ डिजिटल पूर्वी व डिजिटल नंतर ‘ या विषयावर चर्चासत्र.
17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आविष्कार 2024 पारितोषिक वितरण व समारोप सोहळा.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल व सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक विजू माने उपस्थित राहणार आहेत.

केविन डायस – जल रंग चित्रकार (Watercolor painter)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133