पनवेल दि.१६: दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली उरण तालुक्यात सिडको आणि जेएनपीटी च्या भूसंपादना विरोधात मोठा शेतकरी लढा झाला होता. त्या लढ्यात १६ आणि १७ जानेवारी १९८४ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच हुतात्मे झाले होते. त्या हुतात्म्याचा स्मृतीदिन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने साजरा केला जातो. दि. बा. पाटील हयात असताना दरवर्षी दि. बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत असे मात्र दि. बा. पाटील यांच्या मृत्यूनंतर या कार्यक्रमावेळी दि.बा.पाटील यांची आठवण म्हणून खुर्ची रिकामी ठेवली जाते. आजही उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, कामगारनेते महेंद्र घरत, सुरेश पाटील, दिनेश पाटील, भूषण पाटील, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, चंद्रकांत घरत, मेघनाथ म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थांनी अभिवादन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!