रत्नागिरी, ता. २३: अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रत्नागिरीमध्ये या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल जात असून आज दुपारच्या शो दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, हिंदू राष्ट्रसेना, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांची आरती करून ‘तान्हाजी’चा जयजयकार केला. जय भवानी, जय शिवाजी , पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज की जय , भारत माता की जय, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम अशा घोषणांनी राधाकृष्ण सिटी प्राईडचा परिसर दणाणून गेला. आरती, धैर्य मंत्र व प्रेरणमंत्र म्हणण्यात आला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाने वेड लावले आहे. अजय देवगणची चित्रपटात एन्ट्री होताच लोकांनी शिट्या मारल्या. सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. अजय देवगण आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट 4540 स्क्रीन्सवर प्रदर्शित केला आहे. यावेळी सागर कदम, हिमांशु देसाई, कोमल सिंग, राकेश नलावडे, धनंजय कानिटकर, देवेंद्र झापडेकर, गणेश गायकवाड, संजय जोशी, केशव भट, अक्षत सावंत, अमेय पाडावे, निखिल सावंत, अमित नाईक, पुरुषोत्तम वागळे, गणेश घडशी, अशोक पाटील आदींसह अनेह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!