पनवेल दि.०१: पनवेल महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात एकूण १२ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.
@ आज कामोठे सेक्टर-२१ येथील ५६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
@ कामोठे सेक्टर-१० येथील एकाच कुटुंबातील २१ वर्षीय व १३ वर्षीय असे २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तींची आई यापुर्वी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तींना त्यांच्या आईपासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
(आई व्ही.एन.देसाई हॉस्पीटल, मुंबई येथे सफाई सेविका म्हणून कार्यरत आहे.)
@ नविन पनवेल सेक्टर-१३ येथील २१ वर्षीय व १७ वर्षीय अशा २ मुली तसेच ४५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील असून यापुर्वी त्यांचे कुटुंब प्रमुख हे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून यापुर्वी ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले होते. त्यांच्यापासूनच त्यांच्या पत्नीला व मुलींना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
@ कामोठे सेक्टर-९ येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती सायन हॉस्पीटल, मुंबई येथे MRI टेक्नीशन म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
@ खारघर ओवे सेक्टर-३५ येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. हा व्यक्ती मॅजेस्टीक ग्रुप ऑफ कंपनीज, कोपरखैरणे मध्ये कार्यरत आहे. या व्यक्तीचे कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ३ सदस्य हे कोपरखैरणे येथे राहत असून यापुर्वीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
@ कळंबोली येथील आई आणि मुलगा अशा २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हया दोन्ही व्यक्ती यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातील आहेत.
@ खारघर स्वप्नपुर्ती येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
@ नविन पनवेल सेक्टर-६ येथील ४९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती रिलायन्स कंपनी, घनसोली येथे कस्टम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.