पनवेल, दि.21 (संजय कदम) पनवेल रेल्वे स्टेशनवर आज पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी महिलेने महिला अर्भकाला जन्म दिल्याची घटना घडली. संबंधित महिलेचे नाव मनीषा असून, पनवेल ते नेरुळ प्रवासादरम्यान महिलेला प्रसूती वेदना झाल्यावर ती खांदेश्‍वर रेल्वे स्टेशनवर उतरली. यावेळी डॉक्टरकडे जाण्यासाठी पुन्हा खांदेश्‍वर ते पनवेल दिशेने येण्यास सुरुवात केली. ही माहिती, रेल्वे पोलीस यांना मिळाल्या नंतर रेल्वे पोलिसांनी ही माहिती एक रुपया क्लिनिक मधील डॉक्टरला माहिती दिली. त्या दरम्यान रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, खांदेश्वर ते पनवेल रेल्वे स्टेशन दरम्यान तीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!