ठाणे दि.१६: मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग शनिवार दि. 17 मे 2025 रोजी सकाळी 11-30 वाजता सर्वाना घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे येथे शून्य सावली विषयी माहिती देऊन शून्य सावली प्रात्यक्षिक दाखविणार आहे.
यादिवशी ठीक सकाळी 11-30 वाजता सर्वानी घंटाळी मैदान, नौपाडा येथे जमावयाचे आहे. त्यावेळी दा.कृ.सोमण, प्रा.ना. द. मांडगे काही माॅडेलस् दाखवून शून्य सावली विषयी माहिती देतील. दुपारी 12-35 वाजता सर्वाना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
तरी सर्वांनी शनिवार 17 मे रोजी सकाळी 11-30 वाजता घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे येथे यावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग या संस्थेने केले आहे.
![]()
