उलवे, ता. १७ (कृष्णा पाटील) : गव्हाणच्या मनोजने अतिशय खडतर परिस्थितीत दिवस काढले. आई-वडिलांच्या अकाली निधनामुळे तो पोरका झाला. परिस्थितीनुरूप ‘हरकाम्या’ म्हणून त्याने काम केले, पण डगमगला नाही. शरीराने दिव्यांग असला तरी धडपड्या स्वभाव, प्रचंड जिद्द आणि मेहनतीने मनोजने ‘करून दाखवले’. आज गव्हाणमध्ये तो गोरगरिबांना मदत करतोय, प्रथितयश नागरिक म्हणून नावारूपाला आलाय, सन्मानाने जगतोय. अक्षरश: त्याने शून्यातून विश्व निर्माण केल्याचा प्रत्यय आणून दिला, त्यामुळे त्याच्या जिद्दीला माझा सलाम, त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे मला मनस्वी आनंद होत आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत गणेशनगर, करंजा येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते ‘प्रथम एकदंत’ बंगल्याचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शुभांगीताई घरत आणि एमजी ग्रुप टीम उपस्थित होती.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी मनोजचे अभिनंदन केले आणि ‘दोस्त, आगे बढो’ असा आशीर्वाद दिला. मनोज फडकर कुटुंबीयांनी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!