Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
नवी मुंबई दि.७: राष्ट्रीय एकात्मता आणि अवयवदान, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैंपस विथ हेलमेट, सेव्ह वॉटर सेव्ह ट्रीज, रक्त दान या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विराग मधुमालती व त्यांची टीम सज्ज झाली आहे. प्रत्यकी ७ दिवस वरील पैकी प्रत्येक उपक्रमाला समर्पित केले जातील. सध्याचा जगातील सर्वात मोठा ७१२ तास कराओके गायनाचा जागतिक विश्वविक्रम हा चीन च्या नावे असून तो मोडीत काढून नवीन १००० तासांचा विश्वविक्रम भारताच्या नाते करण्याचा विराग मधुमालती यांनी संकल्प केला आहे. १५ नोवेंबरला विश्वविक्रमी गायनाच्या मॅरेथॉनची सुरुवात झाली असून आज ५२४ तासांचा टप्पा पार केला असून संपूर्ण भारतातील विविध राज्यांतून गायक कलाकारांनी आपल्या स्वरांची आहुती या यज्ञात समर्पित केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, भारत गणेशपुरे, लोकशाहीर नंदेश उमप, अभिनेत्री पूजा जैसवाल आदी सिने तारकांनी या प्रसंगी आपली उपस्थिती देऊन गायकांना शुभेच्छा दिल्या आहेत.दि. १४ तारखेला बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ या उपक्रमाचे उद्घाटन दिवंगत अंतराळवीर कल्पना चावला हिचे वडील बनारसी लाल चावला यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. २२ डिसेंबर पर्यन्त हा अविस्मरणीय विश्वविक्रम रात्रंदिवस अखंडित सुरु असणार आहे. या नवीन विश्वविक्रमाने आपल्या देण्याच्या सास्कृतिक क्षेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल शिवाय वरील ज्वलंत सामाजिक उपक्रमांची जनजागृती देखील होईल हे नक्कीच विराग मधुमालती यांनी आजवर चारदा जागतिक विश्वविक्रम केले असून राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृती साठी समर्पित केले आहे. दिव्यांगांच्या वेदना व भावना अनुभवण्यासाठी विराग ने १०० दिवस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोळयातर पट्टी बांधून दिव्यांगांचे जीवन व्यतीत केले व त्या दरम्यान जागोजागी अनेक जनप्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन अवदान जनजागृती केली सुप्रसिद्ध पार्श्व गायिका साधना सरगम व पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गायक कलाकारासाठी ही एक सवर्ण संधी असून समाजासाठी व देशगौरवासाठी महान कार्य होय,