अलिबाग दि.७ : आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा जिल्हाधिकारी महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ.विजय सूर्यवशी यांनी यावेळी केले. जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनाकरिता देण्यात आलेले उद्दिष्ट 102 टक्के पूर्ण केल्याचे सांगितले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जल सेना प्रमुख ॲडमिरल एल.रामदास, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!