उरण दि.9 (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र शासन ठाणे वन्यजीव विभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या तर्फे वन्यजीव सप्ताह 2020 साजरा करण्यात आला या वन्यजीव सप्ताह 2020 चे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी, सारडे विकास मंच-सारडे, अजय मोकल ग्रुप यांच्या सहकार्याने 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या उमेदवारांना कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र, बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.
वनविभागाच्या वतीने दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. या काळात चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेऊन हा सप्ताह साजरा केला जातो. या वेळेस पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, वन्यजीव आणि मानव संघर्ष, वन्यप्राणी संवर्धन – काळाची गरज असे एकूण महत्वाचे 3 विषय चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी स्पर्धकांना देण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धेत हेमाली बगाराम म्हात्रे (प्रथम),रंजना संजय केणी (द्वितीय), ऋचा धीरेंद्र ठाकूर(तृतीय) तर चित्रकला स्पर्धेत
तेजस म्हात्रे (प्रथम), आशिष कृष्णा थळी(द्वितीय), प्रियांशु जयेंद्र मिठागरी(तृतीय) यांनी बक्षीस पटकाविले. विजेत्यांचे गुलाबपुष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वन्य विभाग ठाणे तर्फे निसर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या हरीश पाटील,सर्पमित्र राजेश पाटील, रायगड भूषण राजु मुंबईकर, अमोल आंबोलकर, अजय मोकल, नागेंद्र म्हात्रे, स्नेहल पालकर, रूपेश गावंड, देवाण ठाकूर या पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी व्यक्तींचा निसर्गरक्षक म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला. उप वनरक्षक वन्यजीव विभाग ठाणे चे बी एन पिगळे, RFO चव्हाण साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!