पनवेल दि.9: कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.१४) सायंकाळी ०५ वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दै शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करणार्‍या व अधिकाधिक रक्त संकलित करणार्‍या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे यांनी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!