Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल (विजय पवार) खबरबात तसेच खमंग मेजवानी या कार्यक्रमाचे निर्माते सुमंत नलावडे यांच्या वेबसाईड विश्वातील एक नवी संकल्पना असलेल्या www.khabarbaat360.com या वेबसईडचे उदघाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते रविवारी सकाळी खारघर मधील इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडले.यावेळी राधाकृष्ण मंदीराचे डॉ. सूरदास व भक्तगण तसेच खासबातच्या निवेदिका नाझनीन शेख ,विजय पवार,खमंग मेजवाणीच्या निवेदिका राधिका(गौरी) परदेशी, निर्माते सुमंत नलावडे आदी उपस्थित होते .
वेबसाईड विश्वातील ही अनोखी अशी 360 डिग्रीच्या कॅमेऱ्यातून चित्र दाखवणारी चित्रशैली आजूबाजूच्या प्रत्येक चित्राला मोबाईलच्या स्क्रीनवर बोट सरकवून   पाहता येणार आहे .समोर दिसणाऱ्या प्रत्येक चित्रात आपण स्वतःला ही पाहू शकतो अशी कॅमेऱ्याची कमाल या वेबसाईडच्या माध्यमातून आपल्या जवळ आली आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांशी यावेळी गप्पामय कार्यक्रमात वेबसाईडचे निर्माते सुमंत नलावडे यांनी या 360 डिग्री मधील कॅमेरा आणि यातून साकारणाऱ्या अनोख्या चित्र कौशल्याची कमाल याबाबत माहिती दिली यावेळी पनवेल पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे ,पनवेल प्रेस क्लब चे अध्यक्ष सय्यद अकबर, कर्नाळाचे संपादक मंदार दोंदे,विवेक पाटील, वैभव गायकर, दीपक घरत,छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, नितीन देशमुख, कटेकर, पत्रकार कुणाल लोंढे, रत्नाकर पाटील, दीपक घोसाळकर व इतर पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांना 360 कॅमेऱ्यात  चित्रीकरण केलेले व्हिडीओ आणि छायाचित्र व त्यातील अनेक नाविन्याची माहिती सुमंत नलावडे यांनी पत्रकारांशी संवाद करताना दिली. जगातील वेबसईडच्या विश्वात अनेक वेबसाईड आहेत मात्र 360 डिग्री अंशातूनच चित्रीकरण दाखवणाऱ्या फारच कमी वेबसाईड असून महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग असल्याचे सुमंत नलावडे यांनी सांगितले. ही अनोखी वेबसाईड बनवण्याचे अवघड काम नाशिकच्या मंगेश ठाकूर यांनी केले. कुणाल लोंढे, दीपक घोसाळकर यांनी आपल्या मनोगतातून नलावडे यांच्या कामाचे कौतुक करून पनवेल मधील एक व्यक्ती आशा पद्धतीने उतुंग काम करते याचा आम्हा पत्रकारांना अभिमान असल्याचे नमूद केले आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार विजय पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/12/PHOTO_1260-web-F-scaled.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true]

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!