पनवेल दि.४ : शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे, बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ. युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविला आहे. शहरी भागात शुद्ध मधाच्या नावाखाली भेसळयुक्त मधाची विक्री केली जाते. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात तसेच संबंधीत ठिकाणी मधमाशाचा वावर नसेल तर हे उत्पादन योग्य रित्या होउ शकणार नसल्याचे डॉ युवराज कागीणकर यांनी खबरबातशी बोलताना सांगितले.