पनवेल दि.२०: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे तातडीने हाती घेण्यात आलेल्या मुख्य फिडर जलवाहिनी बदलणे आणि मुख्य फिडर जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या अन्य कामांमुळे सोमवार, दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 09.00 ते मंगळवार, दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री 12.00 या 40 तासांच्या कालावधीत नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली आणि करंजाडे नोडमधली पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतरदेखील पुढील २ दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
तरी संबंधित नोडमधील नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी व सदर कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.