खोपोली दि.२०: वर्षाच्या 365 दिवस पाच वेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. तसेच हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे. हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात असून याद्वारे ‘हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा’ अशीच आजची स्थिती आहे. हिंदू हे कदापि सहन करणार नाहीत. मंडळ काय केवळ हिंदूंसाठीच आहे का ? मंडळाची 365 दिवस वाजणार्या भोंग्यांबाबत काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मु. शीळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर 20 ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात केली. या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्यांना निलंबित करा, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे (NIA) देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच झारखंड, बिहार, बंगाल या राज्यांतील शेकडो शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणून तेथे हिंदु विद्यार्थ्यांना हात जोडून प्रार्थना करण्यास प्रतिबंध करणे, शाळेला रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी देणे, हिंदीऐजवी उर्दू भाषेला प्राधान्य देणे, असे प्रकार घडत आहेत. अशाप्रकारे होत असलेले भारताचे इस्लामिकरण रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
या वेळी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी जागृती करणारे हस्तफलक धरले होते, तसेच विविध घोषणा देण्यात आल्या. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे राजेंद्र पावसकर यांनी यावेळी सांगितले.
