पेण-दि.15 (देवा पेरवी) विशेष श्रमदान शिबिरातून ज्युनिअर कॉलेज जोहेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पेण तालुक्यातील आंबिवली येथे ग्रामस्थ व कृषी विभागाच्या सहकार्याने श्रमदानातून 25 मीटर लांब व 5 फूट ऊंच वन बंधारा साकारला आहे. या बंधाऱ्याचा उपयोग आंबिवली परिसरात पाणी अडविण्यासाठी होणार असून यामुळे येथील भूजल साठ्यात वाढ होऊन पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण होणार आहे. ग्रुप ग्राम पंचायत आंबिवली, कृषी विभाग पेण आणि ज्युनिअर कॉलेज जोहे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील आंबिवली येथे एक दिवसाच्या विशेष श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनासाठी युवा या ब्रीद वाक्याप्रमाणे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गाव शिवारात एका ठिकाणी दगड, माती, रिकाम्या सिमेंट पिशव्यांच्या साहाय्याने कमीत कमी खर्चात वन बंधारा उभारून जल व्यवस्थापन काय असते याचे महत्व येथील शेतकरी व ग्रामस्थांना पटवून दिले आहे. या वन बंधाऱ्यातून पाणी टंचाईवर मात होऊन जवळपास हजारो लिटर पाणीसाठा शिल्लक राहिल असे काम स्वयंसेवक विद्यार्थी यांनी केले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रोकडे, जीतेंद्र गोसावी, सरपंच नेहा प्रशांत पाटील, उपसरपंच मंगला पाटील, ग्रामसेवीका अर्चना पाटिल, सदस्य प्रशांत गजानन पाटील, मोहनलाल म्हात्रे, कमळाकर पाटील, संकेत पाटील, सोनाली पाटील, धनाजी जमदडे, जय हनुमान युवक मंडळाचे युवा सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्या साठी प्राचार्य बी.एन.सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी टी.बी.मोकल, डी.वाय.देसाई, एन.सी.ठाकूर, आर.आर.म्हात्रे, आर.बी.पाटील, डी.डी.पेरवी आदि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!