पनवेल,दि.25: महाविद्यालयीन युवक- युवतींचे कोव्हीड१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याकरिता ‘मिशन युवा स्वास्थ’ मोहिम महापालिकेने हाती घेतलीआली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज पासून (25 ऑक्टोबर) ते 2 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत फक्त महाविद्यालयांतील १८ वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत महापालिकेने सध्या सात महाविद्यालयामध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले आहे. आज या लसीकरण सत्रांमध्ये २७१ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयांमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पिल्लई महाविद्यालय, बार्न्स महाविद्यालय, महात्मा फुले आर्टस् ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय, रामशेठ ठाकूर महाविद्यालय खारघर, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय, कळंबोली, कर्नाटका एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय, कळंबोली याठिकाणी लसीकरण सत्रांचे आयोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
2 नोव्हेंबर पर्यंत “मिशन युवा स्वास्थ्य” मोहिम सर्व महाविद्यालयांमध्ये राबविली जाणार. याठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही या मोहिमेमध्ये लसीकरण केले जाणार आहे. याबरोबरच सर्व सामान्य नागरिकांचे पालिकेच्या नियमित लसीकरण केंद्रावरती लसीकरण सुरू आहे.