पनवेल, दि.6: जगभरांतील डिझाईन व्यावसायिकांमध्ये रुबिकाचे नाव हे एक आघाडीची डिझाईन स्कूल म्हणून प्रसिध्द असून त्यांचे कॅम्पसेस फ्रान्स, कॅनडा, भारत आणि रियूनियन येथे आहेत. रुकीज कडून एक टॉप रेटेड स्कूल म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या या संस्थेच नामांकन हे 2029 मध्ये निमेशन करिअर रिव्ह्यू कडून 2री बेस्ट इंटरनॅशनल निमेशन स्कूल इन द वर्ल्ड म्हणून तर ले फियाग्रो कडून 2015 पासून व्हिडिओ गेम क्षेत्रातील 1ली स्कूल म्हणून प्राप्त झाले आहे. या स्कूलला औद्योगिक डिझाईन साठी 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. रुबिकाच्या माजी विद्यार्थ्यां मध्ये जवळजवळ 50 देशातील 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी सुध्दा अनेक प्रतिथयश पुरस्कार मिळवले असून त्यांना विविध फिल्म फेस्टिव्हल्स तसेच गेम डिझाईन स्पर्धांमध्ये ही पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आणि जगातील तिसरी एआय युनिव्हर्सिटी असून तिची स्थापना मुंबई जवळीत कर्जत येथे जगभरांतील अब्जावधी डॉलर्सच्या व्यवसायांचा अनुभव असणार्या सीईओं च्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ला जगभरांतील 60 हून अधिक सीईओज ने प्रमाणित केले आहे. जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम आणि अध्ययन पध्दती भारतात आणण्याच्या उद्देशाने या युनिव्हर्सिटी ची स्थापना करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात या भागीदारी अंतर्गत 4 वर्षाचा बॅचलर ऑफ डिझाईन (बी डेस) आणि 5 वर्षांचा इंटिग्रेटेड मास्टर ऑफ डिझाईन (एम.डेस) इन ट्रान्सपोर्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, यूएक्स/यूआय डिझाईन, निमेशन, व्हिडिओ गेम आर्ट आणि व्हिडिओ गेम डिझाईन असे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून त्यानंतर पुढील टप्प्यात डिजिटल डिझाईन, इंटक्शन डिझाईन आणि टेक आर्ट सारखे कोर्सेसही सुरु करण्यात येणार आहेत. रुबिका तर्फे या कोर्सेसना अभ्यासक्रम, अभ्यासक्रमशास्त्रातील मानके आणि अध्यापकांचे आदानप्रदान युनिव्हर्सल एआय डिझाईन प्रोग्राम करता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आता पुण्यातील रुबिका इंडियाचा अत्याधुनिक स्टुडिओ 9 महिन्यां करता वापरता येणार असून इंटर्नशिप दरम्यान 1ल्या आणि 3र्या वर्षी 2 सेमिस्टर्स मध्ये याचा वापर करता येणार आहे. या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रकल्पावर आधारीत शिक्षण, उद्योगाच्या मागणीनुसार अभ्यासक्रम, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि जगभरांतील आघाडीच्या डिझाईन तज्ञांकडून मिळणारे ज्ञान यांचा समावेश असून विद्यार्थ्यांना 24 ु7 लॅब्सचा वापर करता येणार आहे. या भागीदारी विषयी बोलतांना रुबिका इंडिया चे सीईओ आणि रुबिका फ्रान्सच्या संचालक मंडळाचे सदस्य मनोज सिंग यांनी सांगितले युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी सारख्या भविष्याकडे पाहणार्या युनिव्हर्सिटी बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आमचा असा विश्वास आहे की यामुळे डिझाईन शिक्षणाचे भविष्य बदलून भारतातील पध्दती बदलतील जेणेकरुन भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील प्रशिक्षक, शिक्षण सुविधा आणि डिझाईन शिक्षणातील सर्वोत्कृष्ट पध्दती प्राप्त होतील. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी चे चान्सेलर तरुणदीप आनंद यांनी सांगितले रुबिका या जगभरांतील आघाडीच्या डिझाईन स्कूल बरोबर सहकार्य करुन आमच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन क्षेत्रातील आकर्षक करियर सह जगभरांतील आघाडीचे शिक्षक आणि शिक्षण सुविधा भारतातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देतांना आंम्हाला आनंद होत आहे. माझा असा विश्वास आहे की पाश्चिमात्य जगात कौशल्याचा खूपच अभाव आहे आणि युनिव्हर्सल एआय मधून पदवी घेतलेले विद्यार्थी जगभरात आपला ठसा उमटवतील. रुबिका फ्रान्स चे सीईओ स्टीफेन आंद्रे यांनी सांगितले युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बरोबरची ही भागीदारी म्हणजे जागतिक शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा दगड आहे. आम्ही एकत्र येऊन डिझाईन क्षेत्रासाठी उज्ज्वल भविष्य घेऊन येत आहोत.