पनवेल दि.३०: शुभांगी संतोष घुले हिला अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल सर्व स्थरातून शुभांगी यांचे अभिनंदन केले जात आहे.
अल्बामा,अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले हिने भारत देशाच्या संघात सहभागी होऊन 2025 च्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेत “ULTIMATE FIRE FIGHTING CHALLENGE” या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले.
या स्पर्धेतील तिचा हा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. अल्बामा येथे 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा अग्निशमन, पोलिस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून 50 देश सहभागी झाले होते. शुभांगीने इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत, या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपला जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कांस्य पदक प्राप्त केले.

“ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. माझ्या प्रशिक्षकांचे आणि कुटुंबीयांचे समर्थन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. यापुढेही मी अधिक मेहनत करू आणि भारताचे नाव उच्च ठरवण्याचे काम करीन.” – शुभांगी संतोष घुले

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!