पनवेल दि.२: खारघरमधील उदयोन्मुख सायकलपटू आभा सोमण हिने चेन्नई येथे २९ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशिया कप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाचा अभिमान वाढवला आहे.
खारघर, पनवेल येथील १७ वर्षीय आभाने उत्कृष्ट जिद्द आणि वेग दाखवत भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक, तर वैयक्तिक २०० मीटर स्प्रिंटमध्ये रौप्यपदक पटकावले.
आभा गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातील फिनिक्स सायकलिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांच्या प्रशिक्षणखाली कठोर सराव करत आहे. या आंतरराष्ट्रीय यशापूर्वी तिने विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने १० राष्ट्रीय पदके जिंकून भारतीय ट्रॅक सायकलिंगमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
अलीकडेच चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आभाने पुन्हा एकदा ट्रॅकवर आपली गुणवत्ता सिद्ध केली असून ती भारतातील आशादायक युवा सायकलपटूंमध्ये गणली जात आहे. तिच्या या यशामुळे नव्या पिढीतील अनेक इच्छुक खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!