मुंबई दि.२० महाराष्ट्रासह देशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्येही 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.