पनवेल दि २२: खारघरची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने नुकतेच पुणे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याकडून खेळतांना ज्युनियर गटात 3 सिल्व्हर व 1 ब्राॅझ पटकावत जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. स्नेहलच्या या चमकदार कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. 
   स्नेहल हि नवी मुबंई क्राईम ब्रांचच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची सुकन्या आहे. स्नेहल माळी ने याअगोदर रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतात सुवर्ण पदक व कास्य पदक पटकावले आहे. पुणे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेकरीता तिला प्रशिक्षक म्हणून दिपाली पाटील, दर्शन सर व दिपाली निकम यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच भारतीय सायकलिंग चे उपाध्यक्ष प्रताप जाधव व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे सरचिटणीस साठे सर यांनी स्नेहल चे कौतुक केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!