पनवेल दि.७: रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतिक्षा यादीवर असणारे सुरक्षा रक्षक मागील २ ते 3 वर्षापासून नोकरीपासून वंचीत आहेत. याकरीता मंडळात नोंदीत असलेल्या आस्थापनात सुरक्षा रक्षकांना वितरीत करणेबाबत नंदाताई भोसले यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधीत आस्थापनांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मंडळाची सुरक्षा नाकारली व खाजगी हेकेदाराचे सुरक्षा रक्षक तैनात केले. महाराष्ट्र शासन स्थापीत रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची व्यवस्था न घेण्याच्या विरोधात संबंधीत सुरक्षा रक्षकांच्या उपस्थीतीत नंदाताई माधवराव भोसले यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे दि १४ फेब्रुवारी २०२३ पासून आमरण उपोषण करणार आहेत. सोबत किसनराव भोसले, बाजीराव भोर, कदम, हनुमंत आनंद गोरे हे उपस्थित रहाणार आहेत.