अलिबाग, दि. 31: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 616 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 67 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-30, पनवेल (ग्रा)-10, उरण-3, कर्जत-1, अलिबाग-1, मुरुड-4, माणगाव-2, तळा-4, राेहा-1, म्हसळा-10, महाड-1 अशा प्रकारे एकूण 67 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात अलिबाग-1, म्हसळा-1, महाड-1 अशा एकूण 3 व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली आहे.


सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-189, पनवेल ग्रामीण-63, उरण-23, खालापूर-7, कर्जत-22, पेण-9, अलिबाग-29, मुरुड-13, माणगाव-34, तळा-7, रोहा-19, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-17, महाड-2, पोलादपूर-12 अशी एकूण 451 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-315, पनवेल ग्रामीण 131, उरण-133, खालापूर-2, कर्जत-4, पेण-4, अलिबाग-7, माणगाव-8, तळा-4, श्रीवर्धन-5, महाड-2, पोलादपूर-1 अशी एकूण 616 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-12, पनवेल ग्रामीण-7, उरण-2, माणगाव-2, तळा-3, महाड-1 असे एकूण 27 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-3, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-4, पोलादपूर-1 असे एकूण 50 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 802 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 566 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 199 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!