पनवेल दि.६: गाणी हा भारतीय चित्रपटसंगीताचा एक महत्वाचा पैलू आणि अविभाज्य घटक. गाण्यांशिवाय हिंदी चित्रपटांचा विचारही करता येत नाही, कारण किमान 3-4 गाण्यांशिवाय हिंदी चित्रपट पूर्णच होत नाही. त्यातही जुनी अर्थात चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातली गाणी म्हणजे रसिकांना अगदी पर्वणीच ! शैलेन्द्र, साहिर, मजरुह, राजेन्द्र कृष्ण अशा प्रतिभावान कवींच्या सुंदरशा कवितांचं उत्कृष्ट गाण्यात रुपांतर करणार्‍या आणि चित्रपटसंगीतावर आपला अमीट ठसा उमटविणार्‍या नौशाद, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, मदन मोहन, रोशन, शंकर जयकिशन, सलिल चौधरी, जयदेव, ओ. पी. नय्यर अशा 25 दिग्गज संगीतकारांना आदरांजली म्हणून ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ तर्फे ‘द लीजंडस्’ अर्थात ‘नौशाद ते बप्पी लाहिरी – एक सफर’ हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी, दि. 9 मे रोजी रात्रौ 8.30 वा. पनवेलमधील फडके नाट्यगृहात सादर करण्यात येत आहे. यात रसिकांना 1950 ते 1980 या तीन दशकातील 25 नामवंत संगीतकारांची प्रत्येकी एक अशी 25 सर्वोत्कृष्ट गीते ऐकायला मिळतील. ही गाणी सादर करणार आहेत आहेत, प्रख्यात पार्श्‍वगायिका संजीवनी भेलांडे, सर्वेश मिश्रा, संदीप शाह, श्रीकांत कुलकर्णी, आकांक्षा भोईर आणि वंडरगर्ल मिथिला माळी. या गुणी सुरेल गायक-गायिकांना साथ करतील – सुभाष मालेगांवकर (अ‍ॅकॉर्डियन), महेन्द्र गोखले आणि प्रवीण फाटक (सिंथेसायझर), विजय तांबे (बासरी), झुबेर शेख (सतार), डॉ. अजित गोरे (गिटार), अजय दामले (तबला आणि ऑक्टापॅड), अनिल खैरनार (ढोलक आणि कोंगो), अनूप वालावलकर (पर्कशन्स). तर रसिकांशी सुसंवाद साधतील श्रीकांत राव. अधिक माहितीसाठी संपर्क : जयंत टिळक : 98194 05245 अथवा डॉ. मनोज रणदिवे : 91672 12012.

🛑Panvel Cultural Center 35th Anniversary:; ‘काळाची पावले ओळखून नवीन तंत्रज्ञान अंगिकारा’- दिनकर गांगल

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!