रायगड दि.04:महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परिक्षा जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात येणार असून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 बैठक (दि.30 ऑक्टोबर 2025) रोजी पार पडली.
या समितीच्या सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथ), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग ललिता दहितुले यांनी परिक्षेची बैठक व्यवस्था पोलिस बंदोबस्त, कस्टडी रुम (प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका व स्वाक्षरीपट ठेवण्यासाठी), जिल्हा नियंत्रण कक्ष, परीक्षा केंद्र, अधिकारी/कर्मचारी नेमणूका, वाहन व्यवस्था, व्हिडीओ चित्रीकरण, भरारी पथक याबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती यांनी या परिक्षेचे आयोजन व संनियंत्रण करताना सर्व यंत्राणांनी अतिशय दक्षतेने काम करणेबाबत सूचना दिल्या.
ही परीक्षा पनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार असून, परीक्षा दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळ सत्र पेपर 1 – 10.30 ते दु. 1.00 या वेळेत व दुपार सत्र पेपर 2 – दु.2.30 ते 5.00 या कालावधीत होणार आहेत.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक, सेक्टर 1 ई, सिडको कॉलनी, कळंबोली मॅकडोनाल्डच्या पाठीमागे, पनवेल येथे सकाळ सत्र स. 10.30 ते दु. 1.00 या कालावधीत पेपर -1 साठी 872 परिक्षार्थी व दुपार सत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 872 परिक्षार्थी
चांगु काना ठाकुर विद्यालय, जनार्दन भगत मार्ग प्लॉट न.8 सेक्टर-14, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे पेपर -1 साठी 546 परिक्षार्थी व दुपार सत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 546 परिक्षार्थी.
के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, सेक्टर 18, सिडको कॉलनी, नवीन पनवेल येथे सकाळ सत्र स.10.30 ते दु.1.00 या कालावधीत पेपर साठी 840 परिक्षार्थी व दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 830 परिक्षार्थी.
सेंट जोसेफ माध्यमिक विद्यालय, प्लॉट नं. 9, सेक्टर 7, नवीन पनवेल (पू) येथे सकाळ सत्र स.10.30 ते दु.1.00 या कालावधीत पेपर 1 साठी 257 परिक्षार्थी व दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 480 परिक्षार्थी.
को.ए.सो. के.व्हि. कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सावरकर चौक, वडाळे तलाव, जुने पनवेल येथे दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -II साठी 426 परिक्षार्थी.
को.ए.सो. व्हि. के. विद्यालय, वडाळे तलाव, जुने पनवेल येथे दुपारसत्र दु.2.30 ते 5.00 या कालावधीत पेपर -11 साठी 305 परिक्षार्थी परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत.
![]()
