कळंबोली दि.०२: सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली मराठी प्राथमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक दत्तात्रय हरी पगार हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापुर्ती सोहळा विद्यालयाच्या वतीने रविवारी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी हितचिंतक, आप्तेष्ट ,नातेवाईक, विद्यार्थी, सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना सेवापूर्ती समारंभ निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कळंबोलीतील मराठी प्राथमिक विद्यालयात गेल्या ३३ वर्षापासून सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असणारे दत्तात्रेय हरी पगार हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. दत्तात्रय पगार यांनी बजावलेल्या सेवे करीता त्यांच्या सेवापूर्ती समारंभ विद्यालयाच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी आज भूषविले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वनिता लक्ष्मण कोळी, माजी मुख्याध्यापिका हेमलता पाटील ,सुषमा गोखले, मुद्रांक अधिकारी भरत गरुड, आरटीओ अधिकारी रश्मी पगार, दत्तात्रय पगार यांच्या पत्नी मनीषा पगार, दीपक पगार, बळवंत पगार,उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे, तसेच पगार यांचे भाऊ-बहीण नातेवाईक मित्र परिवार वर्गशिक्षक, वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त अनेक मित्र वर्ग, सहकारी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून दत्तात्रेय पगार यांचे जीवनातील चढ उताराचा आलेख मांडला. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्य हे विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरित असे असल्याचे यावेळी मुख्याध्यापिका वनिता कोळी यांनी संबोधले. ५८ प्रज्वलित दिव्यांनी औक्षण करण्यात आले. चॉकलेट व नाण्यांचा हार त्यांना परिधान करण्यात आला. कार्यक्रमा निमित्त मनोगत व्यक्त करताना दत्तात्रेय पगार यांनी सांगितले की सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक विभागात काम करण्याची संधी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी मला दिल्याने माझ्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने झाले. माझा सहकारी सर्व परिवार हा माझ्याबरोबर काम करीत असताना जीवाभावाचे ऋणानुबंध जपून वागणूक दिल्यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या सर्व सहकारी मित्र वर्गाचे माझ्याविषयी असलेले प्रेम कधीच विसरू शकणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी वरुणकर यांनी केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!