पनवेल दि. 2: या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची पनवेल, कळंबोळी, नवीन पनवेल असे तीन अग्निशमन केंद्रे झाली आहेत. आज नवीन पनवेल व कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी दोन अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून, नुकत्याच झालेल्या भरती दरम्यान पालिका अग्निशमन विभागात 110 अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी, इमारती या सर्वांचा विचार करून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त कैलास गावडे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे, अग्निशमन अधिकारी हरिदास सुर्यवंशी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एमएमआर भागात सगळयात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरेाग्य सेवेबाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेकडे पाहिले जाते. त्याच पध्दतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाची सर्व टिम पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन, आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहण्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावरती भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिले जात आहे. याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा सुविधा देण्याच्यादृष्टीने विविध उपकरणे पालिका लवकरच खरेदी करणार असल्याचे सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!