पनवेल दि.20: सरकारने मंगळवारी पनवेल आणि उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली पनवेल महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर पनवेलचे गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या असून. नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दुपारी पनवेल महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. मावळते आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांना आयुक्तपदाचा पदभार सोपविला. यावेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होत्या.