पनवेल दि.25 : राज्यात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, रूग्णालये, सीटी स्कॅन सेंटर यांना महापालिकेव्दारे सूचित करण्यात येत आहे, आपल्या दवाखान्यात, रूग्णालयात सीटी स्कॅन सेंटरमध्ये फ्लू, आयएलआय सारी, कोविड सदृश्य रुगण आढल्यास अशा रूग्णांची कोविडची ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर, चाचणी करून घ्यावी.(एचआरसीटी चाचणी केल्यानंतर रूग्णांमध्ये कोविड-निमोनिया किंवा कोविड सदृश्य लक्षणे दिसत असल्यास) पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती खाजगी दवाखान्यांनी, रूग्णालयांनी, सी टी स्कॅन सेंटरर्सने एका तासाच्या आत संबधित कार्यालयास covid19panvel@gmail.com या ईमेलवर तत्काळ कळवावी. असे परिपत्रक शासनाच्यावतीने जारी करण्यात आले आहे.
पालिकेच्यावतीने करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवयश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये सर्वाचेंच सहकार्य महत्वाचे आहे. पालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने, रूग्णालये, सीटी स्कॅन सेंटर्सने कोविड रुग्ण आढळल्यास तात्काळ संबधित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
या आदेशाची रुग्णालय, दवाखान्यांनी, सीटी स्कॅन सेंटरर्सनी तात्काळ अमंलबजावणी करावी. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या संबधित रूग्णालयांवर, खाजगी दवाखान्यांवर तसेच सीटी स्कॅन सेंटरवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 2005 अनुसार आरोग्य विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी परिपत्रकाव्दारे सांगितले आहे.