उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे) द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन- उरण यांच्या विद्यमाने २० वा युवा महोत्सव २०२१ अंतर्गत बुधवार दि.०३ मार्च २०२१ रोजी सायं. ठीक ५ – ०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, ता. उरण, जि. रायगड येथे काव्य-स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. तसेच विषयाचे बंधन नाही. परंतु विषय राजकीय तेढ निर्माण करणारा, कुणाच्या भावना दुखावणारा आणि अश्लील नसावा. कविता स्वरचित व मराठीत असावी. स्पर्धक रायगड जिल्ह्यातील असावा. कविता सादरीकरणाची वेळ फक्त साडे तीन मिनिटे असेल. बक्षिसे- प्रथम- रू.१५००/- द्वितीय- रू.१३००/- तृतीय- रू.११००/- आणि उत्तेजनार्थ: प्रथम- रू. ५५०/- द्वितीय- रू.४५०/- तृतीय- रू. ३५०/- आणि सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच सर्व भागधारकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबर पैकी फक्त एका नंबरशी संपर्क साधून आपले नाव दि.०२ मार्च. सायंकाळी ५ – ०० वाजेपर्यंत नोंदवावे. स्पर्धेत भाग घ्यावा. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण लगेचच होईल.
अध्यक्ष- महादेव घरत,
सचिव- दिलीप तांडेल,
संपर्क- नियोजक/संयोजक – दर्शना माळी-(९८३३७७५४१४), रोहन घरत-(९८१९३९१२१२), संजय होळकर-(९२७०३६७७८८),
राम म्हात्रे-(९९३०८७४०३२),
भ. पो. म्हात्रे-(९८१९५०९५९५०६), कार्यालय- (०२२२७२२४४९८).
स्पर्धा प्रमुख/सूत्रसंचालक- कवि अरुण दत्ताराम म्हात्रे. (९९८७९९२५१९)
कार्यक्रमात फेरफार करण्याचा अधिकार अध्यक्ष/कमिटी यांचा राहील. तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. नाका-तोंडाला मास्क/रुमाल लावावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.