पनवेल दि.८: युवा पिढीमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, हा समृद्ध वारसा त्यांनी जतन व संवर्धन करावा या हेतूने गेली 28 वर्षे पनवेल कल्चरल सेंटर पनवेलमध्ये राज्यस्तरीय हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन केले जात असून या स्पर्धेची पहिली फेरी नुकतीच पार पडली. या फेरीतून 11 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून ती रविवार, दि. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 पासून पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात होत आहे. ही अंतिम फेरी स्पर्धकांसाठी स्पर्धा असली तरी संगीतप्रेमी रसिकांसाठी सुश्राव्य असे युवा संगीत संमेलनच ठरणार आहे. तरी रसिकांनी या श्रवणानंदाचा लाभ घेण्यासाठी आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख मधुरा सोहनी (मोबा. 9920718745) यांनी संगीतप्रेमींना केले आहे.