पनवेल दि.०९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या ११ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून प्राथिमक फेरीतून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका या तीन दिवसांच्या महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत.