कळंबोली दि.१७: शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना समाज जीवनात घडणाऱ्या घडामोडीं बाबत प्रशिक्षण व शिक्षण दिले तर हेच विद्यार्थी भावी पिढीतील सजग नागरिक म्हणून समाजाची सेवा करण्यास तयार होत असतात .यासाठीच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे याकरता कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलने सोमवारी सकाळी कळंबोलीतील अग्निशामक दलातील यंत्रणेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेऊन अग्निशमन करतानाचा थरार अनुभवला. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके व उप अग्निशमन अधिकारी मनिष ग्यानीराम ब्राम्हणकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्रणेची माहिती दिली.
शासनाच्या निर्देशानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रातील कामकाजाची जवळून माहिती व्हावी, कामकाज कसे चालते, एखाद वेळेस जर कोणतीही घटना घडली तर त्याबाबत सजग राहून कोणती उपाययोजना करावी याचे धडे देण्याची सूचना शासनाच्या वतीने दिलेली आहे. याचाच एक भाग म्हणून कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूल मधील शिकणाऱ्या तब्बल ६० विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संतोष बैजनाथ शुक्ला यांनी कळंबोलीतील अग्निशामक दल विभागाला भेट देऊन त्याची माहिती दिली. यावेळी कळंबोलीतील अग्निशामक दलातील प्रमुख अधिकारी प्रवीण बोडके तसेच उप आधिकारी मनीष ब्राह्मणकर तसेच अन्य अग्निशामक सुरक्षा दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे आगीवर किंवा अन्य घटनेवर नियंत्रण मिळवले जाते याची प्रात्यक्षिक करून माहिती दिली. यावेळी सायरन वाजवत कर्तव्यावर जात असणाऱ्या आगीच्या बंबातील सर्व यंत्रेची माहिती या शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिल्याने विद्यार्थी ही चांगलेच सुखावले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना आकर्षण असणाऱ्या आग वीजवणाऱ्या बंबाच्या गाडीमध्ये जाऊन त्याची माहिती घेताना विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. अग्निशामक यंत्रणेची माहिती, यंत्रणा कशी हाताळावी याची जवळून माहिती मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षकही चांगल्या प्रकारे सुखावले. कळंबोलीतील अग्निशामक दलात कार्यरत असलेल्या हायटेक प्रणालीची व यंत्रणेची माहिती ही मनीष ब्राह्मणकर यांनी विद्यार्थी शिक्षक यांना देऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये सजग नागरिक म्हणून आपण कसे वागावे याबाबतची ही विस्तृत माहिती देण्यात आली.फायर एक्स्टींगशन, तसेच हायड्रॉलिक टूल्स चे हाताळणी कशा प्रकारे केली जाते याची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी बोलताना कळंबोली अग्निशामक दल प्रमुख मनीष ब्राह्मणकर म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्रणे बाबत माहिती देताना आम्हालाही आनंद झाला. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन आम्हालाही समाधान प्राप्त झाले. आजचे विद्यार्थी हे भावी आयुष्यातील सजग नागरिक असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते संस्कार न्यू मुंबई इंग्लिश स्कूल करीत आहे ही सुद्धा एक गौरवास्पद बाब आहे.