कळंबोली दि.३ (दीपक घोसाळकर) परदेशात चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवून ओमान येथे पाठवलेल्या गुलबर्गातील तरुणाची बोगस कंपनीकडून घोर फसवणूक करण्यात आली. खोट्या कागदपत्राच्या आधारे पाठवण्यात आलेला तरुण ओमान देशाच्या च्या शासकीय कचाटयामध्ये अडकला .मात्र यावेळी सीबीडी येथील ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार व त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या मदतीने फसगत झालेल्या तरुणाची ओमान मधून सुखरूप सुटका करण्यात संघटनेचे अध्यक्ष संजय पवार हे देवदूत म्हणून ठरले आहेत. फसगत झालेला युवक आठवड्याभरात ओमान मधून पुन्हा आपल्या देशात परतणार असल्याने या युवकाच्या कुटुंबीयांनी संजय पवार व युनियनचे आभार व्यक्त केले आहेत.
गुलबर्गातील अमजद शेख नावाचा तरुण मुंबईतील परदेशात नोकरीला पाठवणाऱ्या बोगस कंपनीच्या माध्यमातून ओमान येथे एजंट ईद्रजीत शर्मा व समिधा शेख यांच्या मार्फत नोकरी निमित्त गेला. या एजंट कडून चुकीची व बोगस कागदपत्रे तयार करून त्याला ओमान येथे पाठवण्यात आले. परदेशात गेल्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली असता बोगस कागदपत्रे आढळून आल्याने ओमान देशाच्या सरकारच्या कचाट्यात हा तरुण मुलगा पुरता अडकला. काय करावे आणि देशातून पुन्हा आपल्या स्वदेशात कसे यावे या विवंचनेने तो व त्याचे कुटुंबीय पुरते ग्रासुन गेले होते. मात्र याच वेळी त्यांना सीबीडी येथील ऑल इंडिया सिफेरर्स युनियन चे अध्यक्ष संजय पवार यांच्याकडे ओमान मध्ये फसलेल्या तरुणाची बहीण युनियन चे कार्यकर्त व उपाध्यक्ष रंजना गायकवाड, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, शीतल मोरे, अंकुश साठे, चेतन डावखरे यांच्यामार्फत पोहोचली. युनियनच्या अध्यक्ष संजय पवार यांनी असलेल्या मुलाची विदारक कहाणी ऐकल्यानंतर त्याने तडक आपल्या कार्यकर्त्यां समवेत ओमान येथे पाठवणाऱ्या कंपनीचे कार्यालय गाठले. तेथील एजंटला पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. योग्य तो पाहुणचार केल्यानंतर त्यांनी केलेली चूक ही कबूल केली. यादरम्यान संघटनेच्या वतीने परदेशातील संबंधित कंपनीशी देशाच्या राजदूतान मार्फत माहितीचे आदान-प्रदान केल्यानंतर ओमान येथे अडकलेल्या भारतीय तरुणाची सुखरूप सुटका करण्याचे वचनही ओमान शासकीय प्रणालीतून मिळाले. मात्र या गडबडीत फसलेल्या तरुणाचे व त्याच्या कुटुंबाचे लाखो रुपयाचे नुकसानही झाले. तरुणांना परदेशात पाठवण्याचे आमिश दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये दिवसाढवळा उकळले जात असल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत. याबाबत बेरोजगार तरुणांनी योग्य ते मार्गदर्शन घेऊन योग्य त्या कंपनीमार्फत परदेशात नोकरीला जाऊन आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली करावी व आपले व आपल्या कुटुंबीयांचेही रक्षण करावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे. गुलबर्गातील तरुणाची फसगत करणाऱ्या कंपनीवर व एजंट वर संघटनेने केलेल्या कार्य तत्पर कामगिरीमुळे पोलिसात तक्रार करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बेरोजगार तरुणांची परदेशात फसवणूक होऊ नये यासाठी आमची संघटना कटीबद्ध असल्याचे संजय पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

🛑Navratri Special:
🔸1 – निर्मिती शक्तीची पूजा
🔹शक्ती उपासनेचे महत्त्व काय

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!