उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात.
1) दि. ३ – ऑक्टो.गुरुवार – पिवळा
2) दि. ४ – ऑक्टो. शुक्रवार – हिरवा
3) दि. ५ – ऑक्टो.शनिवार – ग्रे, करडा
4) दि. ६ – अॅाक्टो. रविवार – केशरी / भगवा
5) दि. ७ – ऑक्टो.सोमवार – पांढरा
6) दि. ८ – ऑक्टो. मंगळवार – लाल
7) दि. ९ – ऑक्टो. बुधवार – निळा
८) दि. १० – ऑक्टो. गुरुवार – गुलाबी
9) दि. ११ – ऑक्टो. शुक्रवार – जांभळा
१०) दि. १२ – ॲाक्टो. शनिवार – मोरपिशी
रंग आनंदासाठी ! (दा. कृ. सोमण – पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक)
नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला आनंद होत असतो. इथे वस्त्र किती किंमतीचे आहे हा प्रश्न नसतो. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते, किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी आहे. उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात.