पनवेल दि.१९: रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात गेली २५ वर्षे सातत्याने विविध वृत्तपत्रात पत्रकारिता करणारे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांच्या कामाची व कार्याची दखल घेत त्यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देवून गौरविण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे अध्यक्ष रो. निलेश पोटे, सचिव रो.हितेश राजपूत, खजिनदार जितेंद्र बालड, डायरेक्टर रो. विजय मेढेकर, संजय जैन, डॉ. जयश्री पाटील, देवयानी पोटे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पनवेल येथील स्व. पावर्तीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी मेघना संजय कदम यांनी प्राणिक हेलींग आणि मेडीटेशन या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमांतर्गत अध्यक्ष निलेश पोटे यांनी आगामी रोटरी क्लब तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध प्रोजेक्ट संदर्भात त्यामध्ये प्रामुख्याने माहिती दिली. यात अस्मिता प्रोजेक्ट त्यामध्ये सॅनिटरी पॅड, वेडीग मशिनचे शाळांना वाटप, स्कील लॅब प्रोजेक्ट, तसेच जल पुर्नजीवन प्रोजेक्ट संदर्भात माहिती दिली.
![]()
