रायगड दि.06:- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.03 ऑक्टोबर 2025 अन्वये नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्याकामी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, कर्जत, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारणेकामी संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण, वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण वेळ निश्चित करण्यात येत आहे.

नगरपरिषदेचे नाव: खोपोली, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- खोपोली नगरपरिषद प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, वासरंग रोड, खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: कर्जत, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- रॉयल गार्डन मंगल कार्यालय, कर्जत, ता.कर्जत, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: अलिबाग, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- अलिबाग नगरपरिषद कार्यालय सभागृह, ता.अलिबाग, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: महाड, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- महाड नगरपरिषद कार्यालय, ता.महाड, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: माथेरान, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.07 ऑक्टोबर 2025, दुपारी 02.30 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-स्व.हिंदुहद्य सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे सभागृह माथेराम नगर परिषद, ता.कर्जत, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: मुरूड जंजिरा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, मुरूड जंजिरा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, दुपारी 3.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालय सभागृह, ता.मुरूड, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: पेण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- पेण नगरपरिषद कार्यालय सभागृह, ता.पेण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: रोहा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- रोहा नगरपरिषद कै.द.ग.तटकरे सभागृह, ता.रोहा, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: श्रीवर्धन, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- श्रीवर्धन नगरपरिषदेचे आ.ती.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, ता.श्रीवर्धन, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

नगरपरिषदेचे नाव: उरण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.9 ऑक्टोबर 2025 ते मंगळवार, दि.14 ऑक्टोबर 2025 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.

🛑मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे:🔸महेंद्र घरत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सदभावना समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!