पनवेल दि.17: पनवेलच्या डोंगररांगात फँन थ्रोटेड लिझार्ड असे नाव असलेला सरड्याच्या मादी पहावयास मिळाली आहे.
सर्पमित्र म्हणून प्रसिध्द असलेले शार्दुल वारंगे काही दिवसांपुर्वी करंजाडे जवळील डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेले होते. निसर्ग भटकंतीची आवड असणाऱ्या शार्दुल निसर्गांतील वैशिट्यपुर्ण विवधता टिपण्याची आवड आहे, महात्मा फुले महाविद्यालयाच्या मागील डोंगरावर फिरत असताना त्यांना वेगळ्या प्रकारचा सरडा दिसला. सरड्याची छायाचित्र काढून त्यांनी त्यांच्या संपर्कांतील व्यक्तींना पाठवली असता हा सरडा वेगळ्या प्रकारचा असून फँन थ्रोटेड लिझार्ड म्हणजेच शास्त्रीय भाषेत सिटाना स्पायनासेफलस असे नाव आहे. या सरड्याच्या नराच्या मानेखाली हातपंख्या सारखा मोठा आकार असतो. सफेद पिवळसर रंगाचा पडद्यासारखा आकारामुळे नर सरड्यावर वर्चस्व आणि मादीला आकर्षित करण्याकरिता उपयोग केला जातो अशी माहिती त्यांना अभ्यासकांनी दिली. ह्या प्रजातीतील निळ्या रंगाचा पडदा असलेला सरडा घाट माथ्यावर सापडतो, पिवळ्या रंगाचा पडदा असलेल्या सरड्याचे अस्तित्व ठाणे, डोंबिवली परिसरात आढळलेले आहे, मात्र पनवेलच नव्हे तर रायगड परिसरात फारश्या नोंदी नसल्याचे शार्दुल यांनी सांगितले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत काम करणारे सरपटणाऱ्या वर्गांतील प्राणीतज्ञ वरद गीरी आणि वन्यसजीव संरक्षक विभागाचे जिल्हा मानद अमित चव्हाण यांना याबाबत माहिती दिली असता काही वर्षांपुर्वी खारघर परिसरात अशा प्रकारचा सरडा आढळा होता, मात्र पनवेल उरणभागात हा पहिल्यांदाच दिसतो आहे, विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात देखील हा सरडा आढळत नाही. तज्ञांनी दिलेल्या दुजोऱ्यामुळे शार्दुल यांच्या भटकंतीतून पनवेलमधील निसर्गांतील विविधता बदल समोर आला आहे.
