पनवेल दि.८: भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली निमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ चे पारितोषिक वितरण संपन्न झाले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठानने प्रथम, रामश्री मित्र मंडळाने द्वितीय, तर कट्टा गॅंग पनवेलने तृतीय क्रमांक पटकाविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ०७ हजार रुपये तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ०५ हजार व ०३ हजार रुपये असे होते. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ४५ हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषकने सन्मानित करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, उदित नाईक, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
- ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ निकाल-
प्रथम क्रमांक (०७ हजार रुपये)- राजे शिवराय प्रतिष्ठान
द्वितीय क्रमांक (०५ हजार रुपये)- रामश्री मित्र मंडळ
तृतीय क्रमांक (०३ हजार रुपये)- कट्टा गॅंग
उतेजनार्थ (प्रत्येकी ०२ हजार रुपये)- जागृत पाटील, अमित कापरे, वरद क्षिरसागर, सार्थक जगे, महेंद्र उनाडकत, नितेश जाधव, अयुष रॉय, तनिश, निखिल काथारा, सूरज मोकाशी.
उतेजनार्थ (प्रत्येकी ०१ हजार रुपये)-विनय इनामदार, पिंटू वर्मा, बालग्राम, अक्षय वाडेकर, कोळशेवर, आर्यन काटे, विनायक पनवेलकर, अभिमन्यू शक्का, श्रीनाथ गायकवाड, मधीशा पाटील.