पनवेल,दि.9: गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीच्या काळात पनेवल महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ,आपल्या कुटूंबियांची पर्वा न करता रात्रं दिवस काम केले. नुकताच त्यांच्या या कामाचा सन्मान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे पश्चिम विभाग मुख्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल आयपीएस अधिकारी के.एन. त्रिपाठी, डेप्यूटी इन्स्पेक्टर जनरल डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या हस्ते महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
खारघर येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे इन्स्पेक्टर धर्मपाल सोमकुमार व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापलिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. रोमा, डॉ. वर्तिका, डॉ. कोमल, लॅब टेक्नीशियन शिवम, फार्मासिस्ट शितल यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी तिसऱ्या लाटेविषयी चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यातही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला महापालिका मदत करेल असे आश्वासन डॉ. गोसावी यांनी दिले.