पनवेल दि.२३: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन भाजपचे ज्येष्ठ नेते व पनवेल नगरपरिषेदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर व कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील, ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथबुवा पडघेकर, महादेवबुवा शहाबाजकर, सारेगम फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जे. टी. पाटील, संतोषबुवा पाटील, अध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संयोजक मोहन म्हात्रे, सुचिता वांजळे, आयोजन समितीचे पं. उमेश चौधरी, वसंतबुवा पाटील, पुनमताई ठाकूर, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, नारायणबुवा पाटील, चंद्रकांत मने, जगदिश म्हात्रे, पवन राजे, शैलेश वाजेकर, विनोद तोडेकर, प्रसाद पाटील, सागर राजे यांच्यासह भजन मंडळी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. अध्यात्म महाराष्ट्राचे भूषण असून आपली संस्कृती संपूर्ण देशात पोहोचली आहे. राज्य सरकारने याची दखल घेत भांडवली अनुदान म्हणून १८०० भजन मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली असून त्याबद्दल सरकारचे परेश ठाकूर यांनी आभार मानत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्याने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असून या पुढेही आयोजन करत राहणार आहे, असेही त्यांनी प्रास्ताविकात अधोरेखित केले.
![]()
