रायगड दि.05:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 च्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादी प्रसिध्दी नुसार जिल्ह्यात पुरुष 9 हजार 311, महिला 11 हजार 355 तर तृतीय पंथी 2 असे एकूण 20 हजार 668 मतदारांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
रायगड मतदार संघात एकूण 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 12 लाख 59 हजार 567 मतदार तर महिला 12 लाख 29 हजार 130 मतदार तर तृतीय पंथी 91 आहेत
188-पनवेल- पुरुष 3 लाख 46 हजार 402 मतदार तर महिला 3 लाख 5 हजार 586 मतदार तर तृतीय पंथी 74 असे एकूण 6 लाख 52 हजार 62 आहेत.
189-कर्जत- पुरुष 1 लाख 59 हजार 293 मतदार तर महिला 1 लाख 59 हजार 446 मतदार तर तृतीय पंथी 3 असे एकूण 3 लाख 18 हजार 742 आहेत.
190-उरण- पुरुष 1 लाख 71 हजार 526 मतदार तर महिला 1 लाख 70 हजार 563 मतदार तर तृतीय पंथी 12 असे एकूण 3 लाख 42 हजार 101 आहेत.
191-पेण- पुरुष 1 लाख 54 हजार 661 मतदार तर महिला 1 लाख 53 हजार 317 मतदार तर तृतीय पंथी 1 असे एकूण 3 लाख 7 हजार 979 आहेत.
192-अलिबाग- पुरुष 1 लाख 50 हजार 543 मतदार तर महिला 1 लाख 55 हजार 686 मतदार, तर तृतीय पंथी 1 असे एकूण 3 लाख 6 हजार 230 आहेत.
193-श्रीवर्धन- पुरुष 1 लाख 29 हजार 918 मतदार तर महिला 1 लाख 35 हजार 368 मतदार असे एकूण 2 लाख 65 हजार 286 आहेत.
194-महाड- पुरुष 1 लाख 47 हजार 224 मतदार तर महिला 1 लाख 49 हजार 164 मतदार असे एकूण 2 लाख 96 हजार 388 आहेत.
निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निवडणूक निरीक्षक रुही खान, सतिश कुमार एस आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मनुष्यबळाची दुसरी जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकूण 2हजार 820 मतदान केंद्रा करीता 14 हजार 216 इतकी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात उपलब्ध कर्मचारी संख्या 15 हजार 169इतकी आहे. या सर्व कर्मचाऱयांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली.
188 पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण 604 मतदान केंद्र असून 3 हजार 74 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 3 हजार 487 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
189 कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 362 मतदान केंद्र असून 1 हजार 934 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 961 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
190 उरण विधानसभा मतदार संघात एकूण 355 मतदान केंद्र असून 1 हजार 869 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 893 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
191 पेण विधानसभा मतदार संघात एकूण 380 मतदान केंद्र असून 2 हजार 24 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 2 हजार 360 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
192 अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 375 मतदान केंद्र असून 1 हजार 983 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 992 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण 351 मतदान केंद्र असून 1 हजार 658 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 734 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण 393 मतदान केंद्र असून 1 हजार 674 कर्मचारी आवश्यक आहे. या मतदार संघांसाठी 1 हजार 740 मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.