पनवेल दि.०५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथक ने आज सकाळी ०८:०० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत बेकायदेशीर रोकड, अन्य संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेऊन वाहन तपासण्याचे कार्य करीत असता सकाळी साधारणतः ९: ५५ वाजता मुंबई-गोवा हायवे येथील पळस्पे फाटा चेक नाका येथे रोडवरून जाणाऱ्या गाडी क्रमांक MH -४६-BM-८६२० सुपर कॅरी टेम्पो सिल्व्हर रंगाची चार चाकी गाडीला थांबवून तपासणी केलो असता त्या गाडीमध्ये ३४९५००/- रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम भरारी पथकामार्फत जप्त करण्यात आली.
सदर कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संजय भालेराव, सहायक खर्च निरिक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी.एस. बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष दिनेश भोसले, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आसा डोळस तसेच भरारी पथक प्रमुख लक्ष्मण जाधव, सहायक प्रमुख सचिन पवार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे ASI माने, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पो.ह. राम म्हात्रे, कामोठे पोलीस ठाण्याचे पो.शि.गणपती पाटील, खारघर पोलीस ठाण्याचे भूषण चौधरी उपस्थित होते.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा
🛑Happy Diwali – Ramsheth Thakur
🪔’दिवाळी पहाट’ २०२४
🔉वडाळे तलाव, पनवेल.
🎼आनंद गंधर्व पं.आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचे सुमधुर गायन
🛑’सरकार हे जनतेचे सेवक असले पाहिजे’- महेंद्र घरत
🪔’दीपसंध्या’ २०२४
🔉गावदेवी मैदान, खारघर
🎼सुप्रसिद्ध गायिका मैथली ठाकूर यांचे सुश्राव्य गायन
🪔”इंद्रधनु” मानव-पर्यावरण संवाद साधणारा दिवाळी अंक

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!