‘महायुतीच्या सरकारने कोटी-कोटी रुपयांची कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले’ – शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील
पनवेल, दि.१५: सत्तेवर बसलेल्या महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या योजनेच्या नावाखाली कोटी-कोटींची कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होण्याऐवजी या नेत्यांचाच विकास अधिक झाला असे प्रतिपादन पनवेल येथील आद्य क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित पनवेल विधानसभा 188 मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लिना अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कुटुंबप्रमुखांचा वचननाम्याचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.
या जाहीर सभेत शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा समन्वयक तथा निरीक्षक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपजिल्हा संघटक अ‍ॅड. प्रशांत अनगुडे, महानगर समन्वयक दिपक घरत, जिल्हा प्रवक्त्या सुवर्णा वाळंज, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्‍वर बडे, महानगर संघटक डीएन मिश्रा, युवासेना सहसचिव अवचित राऊत, नितिन पाटील, शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव, शहर प्रमुख खांदाकॉलनी सदानंद शिर्के, शहर प्रमुख नवीन पनवेल यतीन देशमुख, शहर प्रमुख कळंबोली सूर्यकांत म्हसकर, शहर प्रमुख कामोठे रामदास गोवारी, शहर प्रमुख तळोजा प्रदीप केणी, शहर प्रमुख खारघर गुरु म्हात्रे, मधुकर पाटील, मंगेश आढाव, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, तालुका संघटिका अनीता डांगरकर, पनवेल शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, प्रतिभा सावंत, यांच्यासह, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितले की, शेकापक्षामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आली आहे. त्यांनी काही कारण नसताना अगोदरच 4 उमेदवार जाहीर केले. परंतु मतदार सुज्ञ आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार लिना गरड यांनाच विजयी करतील यात तिळमात्र शंका नाही. आता ऑपरेशनमधून बाहेर पडलो आहे येत्या 2 दिवसात प्रत्येक गावागावात जावून लिना गरड यांना विजयी करण्यासाठी आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी सुद्धा पनवेलचा विकास करण्याऐवजी भकास केले आहे. महानगरपालिका सुद्धा त्यांच्या तालावर नाचत असून अनेक आंदोलने छेडून सुद्धा मार्ग निघत नाही. त्यासाठी आता बदल करा व मशाल पेटवा असे आवाहन त्यांनी केले. तर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लिना गरड यांनी महानगरपालिकेने लादलेला कर हा रद्द करण्यासाठी, वाढती बेरोजगारी, बेकायदेशीर बांधकामे, लावलेली शास्ती याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी तसेच येथील भाजप प्रणित सत्ताधारी पनवेल लुटण्याचे काम करीत आहे त्याला आळा घालण्यासाठी मला निवडून द्या, असे त्यांनी आवाहन केले आहे.

🔸वासुदेव म्हणतोय, ‘मतदान करा तुम्ही मतदान करा’ …

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!