पनवेल दि.30: नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जीवन विमा सुरक्षा कवच मिळावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, राज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग हे कमांक दोनचा महसूल मिळणून देणारा विभाग आहे. कोविड १९ महामारीच्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या लॉकडाऊनपासून नोंदणी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सर्व कार्यालयामध्ये दस्त नोंदणीचे काम सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता शंभर टक्के योगदान देत आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी दररोज शेकडो व्यक्तींच्या संपर्कामध्ये येत आहेत वे दस्त ऐवज़ हाताळत आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली असून काहींचा मृत्युही झालेला आहे. तसेच बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाना कोविडची लागण झाली आहे. केवळ कार्यालयीन कामकाज करताना व शासनाचा महसूल गोळा करताना कोविडची लागण झाली आहे. आरोग्य सेवकांनंतर या विभागातील कर्मचारी हे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येत असताना व अपुऱ्या मनुष्यबळ व पुरेस्या सुविधा अभावी त्यांच्यावर नियंत्रण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी १८०० कोटी रूपयांचा महसूल शासनास मिळवून दिला आहे. ते सर्वजण महसूल जमा करण्यासाठी कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थित राहून कार्यरत आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे कोविड योद्धांसाठी ५० लाखांचा विमा कवच देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या मागणीत अधोरेखित केले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे महसूलमंत्री, महसूल नोंदणी व मुद्रांक अप्पर मुख्य सचिव, आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनाही माहितीस्तव प्रत दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!